जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२१ । कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सोनाच्या आणि चांदीच्या भावामध्ये उच्चांक आणि नीचांक दोन्ही बघायला मिळाले. मागील काही दिवसापासून सातत्याने सोने चांदीचे दर वरखाली होतानाचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसापासून जळगाव सुवर्णबाजारात सोने आणि चांदीचे भावात किंचित बदल झालेला दिसून येतोय.
जळगाव सराफ बाजारात १ ऑगस्ट २०२१ ला सोन्याच्या प्रति तोळ्याचा भाव ४९,४१० इतका होता. त्यात आतापर्यंत १ हजार रुपयापर्यंत स्वस्त झाले आहे. तर चांदीचा भाव प्रति १ किलो ६९,८०० इतका होता. त्यात मोठी घट होऊन चांदी ५,६०० रुपयापर्यत स्वस्त झालीय.
सराफ बाजारात सोने अजून विक्रमी पातळीच्या तुलनेत ८००० रुपयांनी स्वस्त आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचा भाव ५६२०० रुपयांपर्यंत वाढला होता. चांदीमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रचंड घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये चांदीचा भाव ७७८४० रुपयांच्या विक्रमी स्तरावर गेला होता. त्यात जवळपास १७००० रुपयांची घसरण झाली आहे.
दरम्यान, जगाच्या अर्थव्यवस्थेत येणाऱ्या आर्थिक सुधारणांमुळे येत्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या किमती कमी होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८३४ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,३४० रुपये आहे.
आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६४,१९० रुपये इतका आहे.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी सहावी योजना सुरू केलीय. यासाठी सब्सक्रिप्शन 30 ऑगस्टपासून सुरू होणार असून, 3 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. सोन्याच्या बाँडसाठी इश्यू किंमत 4,732 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आलीय, यासाठीचे अर्ज सोमवारपासून सुरू केले जाणार आहेत. ऑनलाईन किंवा डिजिटल पेमेंट करण्यासाठी 50 रुपये प्रति ग्रॅम स्वतंत्रपणे उपलब्ध असेल.