जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२३ । आता तुम्ही स्वस्त दरात सोने-चांदी (Gold Silver Rate) घरी आणू शकता. खरं तर, आज म्हणजेच गुरुवारी सराफा बाजारात मोठी घसरण झाली असून, त्यासोबत सोने-चांदीच्या खरेदीवर हजारोंचा नफा कमावण्याची मोठी संधी आहे. या आठवड्यात सोमवार, मंगळवार आणि बुधवारनंतर सलग चौथ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी दोन्ही धातूंच्या किमती सातत्याने घसरल्या आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने बनवण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे…

आज गुरुवारी (28 सप्टेंबर) भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 53,148 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची किंमत 57,980 रुपयांवर पोहोचली आहे. यासह चांदीचा भाव 70,640 रुपये प्रति किलोवर आला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरील आजचा दर
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी १०. ३० वाजेपर्यंत सोने 0.32 टक्क्यांनी म्हणजेच 182 रुपयांनी घसरून 57,490 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा भाव येथे 0.07 टक्क्यांनी किंचित 47 रुपयांनी वाढून 70,596 रुपये प्रति किलो झाला आहे.
जळगाव सुवर्णनगरीतील दर?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 53,850 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 58,600 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर 71,500 रुपयावर आला आहे.