लग्नसराईमध्ये सोने- चांदीचे भाव वधारणार? वाचा आजचे नवीन दर
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२२ । आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतीत वाढ दिसून येतेय. आज सकाळी १० वाजेपर्यंत सोन्याच्या किमतीत ०.८ टक्क्यांनी वाढ दिसून आली. दुसरीकडे चांदीच्या किमतीत किंचित घसरण झाली आहे. दरम्यान, येत्याकाही दिवसात लग्नसराई सुरु होणार असून या काळात सोने- चांदीचे भाव वधारू शकतात
गुरुवारी सकाळी १० वाजता फ्युचर्स मार्केटमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव १७ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ५०,७३० रुपये झाला. तर दुसरीकडे आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदी किंचित घसरली आहे. चांदीचा दर आज १० रुपयांनी वाढून ५८,१६४ रुपयांवर आला आहे.
जळगाव सुवर्णनगरीत सोने घसरले?
दरम्यान, जळगाव सुवर्णनगरीत गेल्या आठवड्यात अर्थात सोमवार १८ ऑक्टोबरला सोने ५० हजार ७०० रुपयांवर होते. यानंतर धनत्रयोदशीला सोन्याचे दर ५१ हजार ५०० रुपयांवर पोहचले होते. तेच दर लक्ष्मीपुजनाच्या दिवशी ३०० रुपयांनी कमी होऊन ५१ हजार २०० रुपये झाले. तसेच दिवाळीनंतर देखील सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली. सध्या सोन्याचा भाव ५१,००० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर सध्या चांदीचा प्रति किलोचा दर 58,300 रुपयापर्यंत आहे. दरम्यान, गेल्या ४ ते ५ दिवसात सोन्याच्या किमतीत जवळपास ५०० रुपयाची घसरण दिसून येतेय.
दरम्यान, दिवाळी (Diwali) झाल्यानंतर तुळशीविवाह होऊन लग्नसराईला सुरुवात होईल. या दरम्यान, सोन्याची मागणी आणखी वाढणार आहे. यात गेल्या महिन्यात ५२ हजार रुपयांच्या पुढे गेलेले सोन्याचे भाव आता ५० ते ५१ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र लग्नसराईमध्ये सोने- चांदीचे भाव वाढण्याची शक्यता असून त्यामुळे सध्याच्या भावात सोने घेणे फायदेशीर ठरणार आहे.
सोन्याची शुद्धता कशी तपासायची
तुम्ही घरबसल्या बीआयएस केअर अॅपद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकता. सोन्याचा परवाना क्रमांक, हॉलमार्क किंवा नोंदणी क्रमांक चुकीचा असेल तर तुम्ही थेट सरकारकडे तक्रार करू शकता. तक्रार नोंदवल्यानंतर याप्रकरणी काय कारवाई केली, याचीही माहिती मिळेल.