जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२१ । सोन्यातील तेजी पुन्हा एकदा या मौल्यवान धातूला विक्रमाच्या दिशेने नेत आहे. जळगावातील सुवर्णबाजारात आज पुन्हा सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज सोन्याच्या भावात प्रति १० ग्रम ५३० रुपयाने वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात तब्बल ११०० रुपयांची वाढ झाली आहे. सततच्या दर वाढीने जळगावात सोन्याचा भाव ४९ हजारांवर गेला आहे. तर चांदीने ७७ हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे.
कोरोनाची दुसरी लाट, जीडीपीवर होणारा परिणाम आणि आर्थिक अनिश्चितता या घटकांनी पुन्हा एकदा सोन्याच्या दरवाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन महिन्यात सोन्याचा भाव ३ ते ४ हजार रुपयाने वाढला आहे.
सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९७० रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,७०० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,७३३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४७,३३० रुपये मोजावे लागतील.
चांदीचा भाव
आज चांदीच्या भावात वाढ झाली आहे. आज १ ग्राम चांदीचा भाव आज ७७.०३ रुपये इतका असून १ किलोचा दर ७७,३००रुपये इतका आहे.