⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | रशिया-युक्रेन संकटाचा सोने भावावर असाही परिणाम, वाचा प्रति तोळ्याचा भाव

रशिया-युक्रेन संकटाचा सोने भावावर असाही परिणाम, वाचा प्रति तोळ्याचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । रशिया आणि युक्रेनमधील संकटाचा थेट परिणाम सोन्याच्या खरेदी-विक्रीवर दिसून आला. दोन्ही देशांच्या दबावात गुंतवणुकदारांनी सोन्याकडं मोर्चा वळविला होता. सुरक्षित गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग म्हणून सोन्याला पसंती दिल्यानं सोन्याच्या भावानं ५२ हजारांचा टप्पा पार केला होता. जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ५२,७५० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर दीचा ६७,५८० रुपये प्रति किलो इतका आहे.

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशात तणाव निर्माण झाला होता. यामुळे जगभरात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीत वाढ झाली असल्याचं दिसून आले आहे. मात्र दोन दिवसापूर्वी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या वृत्ताचा थेट परिणाम सोन्याच्या बाजार पेठेवर दिसून आला.

काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. सोने तब्बल ११९० रुपयाने महागले होते. तर चांदी १४८० रुपयांनी महागली होती. या आठवड्यात सोने जवळपास १५०० ते १६०० रुपयाने महागले आहे. त्याचबरोबर चांदीत २५०० रुपयाची वाढ दिसून आलीय. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल, असे मानले जात आहे. सोने लवकरच ६०,००० रुपये प्रति १० ग्रॅमची पातळी गाठू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

या आठवड्यातील दर?
जळगाव सराफ बाजारात सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५१,२९० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ५१,२५०, बुधवारी ५१,५१०, गुरुवारी ५१,५६०, शुक्रवारी ५२,७५० रुपये प्रति तोळा इतका होता. दुसरीकडे सोमवारी चांदीचा प्रति किलोचा दर ६५,४०० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ६५,०८०, बुधवारी ६५,८५०, गुरुवारी ६६,१००, शुक्रवारी ६७,५८० रुपये प्रति किलो इतका होता.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.