⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी महागली ; वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी महागली ; वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन पाटील । दिवाळीचा सण जसा जवळ येतोय, तसे सोने आणि चांदीचे भाव वाढताना दिसत आहेत. जळगावमध्येही सोने भाव आता ४९ हजार रुपयांच्या उंबरवठ्यावर येऊन ठेपले आहे. दरम्यान, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. आज सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम ४०० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या भावात प्रति किलो ६६० रुपयाची वाढ झाली आहे. दरम्यान, दिवाळीनंर सोन्याचा भाव ५७ ते ६० हजार रुपयांपर्यंत जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

जळगावात काय आहेत भाव?

mygoldsilver वेबसाईटनुसार जळगाव सराफ बाजारात आज सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,९२० रुपये प्रति तोळा एवढे झाले. दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा भाव ६७,२०० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात सतत वाढ होत आहे.  या ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीचे भाव वधारू लागले आहे. १ ऑक्टोबरला प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७४१० रुपये इतका होता. तर चांदीचा प्रति किलो ६१ हजार रुपये इतका होता. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या भावात १५०० रुपयापर्यंतची वाढ झाली आहे तर चांदीच्या भावात ६१६० रुपयाची मोठी वाढ झाली आहे.

mygoldsilver वेबसाईटनुसार जळगाव सराफ बाजारात गेल्या आठवड्यात सोन्याच्या भाव तीन वेळा स्वस्त तर दोन वेळा महागले आहे. त्यात सोन्याच्या ८२० रुपयाची घसरण दिसून आली तर ३०० रुपयाची वाढ दिसून आली. दुसरीकडे मात्र, चांदीच्या भावात मोठी वाढ दिसून आली. गेल्या आठवड्यात चांदीच्या भावात २७८० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, गेल्या दिवाळीत सोन्याच्या प्रति तोळ्याचा भाव ५२,१२० इतका होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचा कमी असला तरी दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव चांगलाच वधारेल, असे म्हटले जात आहे. दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत ५७ हजार रुपयांपासून ६० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते १० ते १२ हजार प्रति १० ग्रॅमपर्यंत वाढू शकतात. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की, दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर ७६,००० ते ८२,००० रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात.

गेल्या आठवड्यातील सोने दर?

सोमवारी (१८ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,३२० होते, त्यात ७२० रुपयाची घसरण झाली होती. मंगळावारी (१९ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,४०० इतका होता. त्यात किरकोळ ८० रुपयाची वाढ झाली होती. बुधवारी (२० ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४८,३९० रुपये इतका आहे. त्यामध्ये १० रुपयाची किंचित घट झाली होती. गुरुवार (२१ ऑक्टोबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,६१० रुपयाने इतका आहे. शुक्रवार (२२ ऑक्टोबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,५२० रुपयाने इतका आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.