जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२२ । येत्या दोन दिवसाने देशभरात नवरात्रोत्सव सणाला सुरुवात होता. या काळात येणाऱ्या दसऱ्याला अनेक जण दागिने खरेदी करतात. अशातच जर तुम्ही देखील सोने आणि चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करून ठेवत असाल तर आज आम्ही तुम्हाला गेल्या आठवडाभरात दोन्ही धातूंमध्ये किती बदल झाला याबाबत सांगणार आहोत.
आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे गेल्या काही सत्रात सोने आणि चांदीच्या भावात चढ-उतार दिसून आली. जळगावमध्ये देखील या आठवड्यात मध्यंतरी सोन्याच्या भावात वाढ दिसून आली. मात्र आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण दिसून आलीय. तरी पण या आठवड्याच्या सोन्याच्या भावात किंचित वाढ दिसून आली. मात्र दुसरीकडे चांदीच्या भावात मोठी वाढ झालेली दिसून येतेय. Gold Silver Price Today
MCX वरील भाव:
गेल्या आठवड्याच्या MCX वर 24 कॅरेट सोन्याचा भाव 49,343 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता. तो सध्या ४९,३९९ रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तसेच गेल्या आठवड्यात चांदीचा प्रति किलोचा दर 56,729 रुपये इतका होता. तो सध्या ५६,२७५ रुपये इतका आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
जळगावमधील दर
जळगाव सराफ बाजरात सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 46,810 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 50,100 रुपये इतका आहे. यापूर्वी आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,600, मंगळवारी 50,550, बुधवारी 50,600, गुरुवारी 50,500, शुक्रवारी 50,700 असा होता. दरम्यान, दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा दर 58,700 रुपये आहे. तो गेल्या आठवड्यात 57,000 रुपये इतका होता.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.
२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.
२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.
२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.
१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.
१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.