⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | वाणिज्य | Gold Silver Price : सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले, मात्र चांदीमध्ये घसरण सुरूच

Gold Silver Price : सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले, मात्र चांदीमध्ये घसरण सुरूच

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२२ । सोने (Gold Rate) सलग दुसऱ्या दिवशी महागले असून सोने पुन्हा वरच्या दिशेने जाऊ लागले आहे. तर चांदी (Silver Rate) मात्र घसरली आहे. आज मंगळवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात किंचित ८० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात ११० रुपयाची घसरण झाली आहे.यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने २९० रुपयांनी महागले होते. तर चांदी १६० रुपयांनी स्वस्त झाली होती.

जळगावातील आजचा सोने चांदीचा भाव? Gold Silver Rate Today
आज मंगळवारी सोने प्रतीताेळा ५२,१०० रुपायांवर आले आहे. तर चांदीचे दर प्रति किलो ६२,७४० रुपयांवर पोहोचले आहेत. दरम्यान, सोन्याचे दर हे दिवसातून दोनदा जाहीर होतात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू झाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा सायकांळच्या वेळेस. त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत आढळून येते.

कोरोना महामारीनंतर आता जगासमोर मंकीपॉक्स विषाणूने संकट उभं केले आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक कमॉटिडी बाजारात सोन्याच्या किंमतीत तेजी दिसून आली आहे. देशांतर्गत बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले आहे. तर दुसरीकडे सलग दुसऱ्या दिवशी चांदी घसरली आहे. दोन दिवसात सोने ३७० रुपयांनी महागले आहे. दुसरीकडे चांदी २७० रुपयांनी स्वस्त झाली आहे. मागील काही दिवसाच्या दरवाढीने सोन्याच्या भावाने पुन्हा ५२ हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

यापूर्वी १ मेला ५२५०० रुपायांवर असलेला सोन्याचा दर गेल्या आठवड्यात ५१ हजार रुपायांवर आला होता. तर दुसरीकडे चांदी ६५,५०० रुपायांवरून गेल्या आठवड्यात ६१ हजारांवर आला होता. गेला आठवड्यात सोन्या सह चांदीचे दर महागले आहे. त्यात मागील आठवड्यात पाच दिवसात चांदी तब्बल ३ हजार रुपयांनी महागली आहे. तर सोने ६०० ते ७०० रुपयांनी महागले आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
१६ मे २०२२- रुपये ५१,०४० प्रति १० ग्रॅम
१७ मे २०२२ – रुपये ५१,४३० प्रति १० ग्रॅम१७
१८ मे २०२२ – रु ५१,३५० प्रति १० ग्रॅम
१९ मे २०२२ – रु ५१,४०० प्रति १० ग्रॅम

गेल्या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
१६ मे २०२२- रुपये ६०,७२० प्रति किलो
१७ मे २०२२ – रुपये ६२,३५० प्रति किलो
१८ मे २०२२- रुपये ६२,५९० प्रति किलो
१९ मे २०२२- रुपये ६२,२०० प्रति किलो

शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.