---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

सोने चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच, वाचा आजचे दर

gold silver
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२२ । सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) भावात चढ-उतार सुरूच असून आज गुरुवारी पुन्हा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सोबतच चांदीही महागली आहे. आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात ४०० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदी ५८० रुपयांनी स्वस्त झाली आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोने २९० रुपयाने तर चांदी ६७० रुपयाची घसरण झाली होती.

gold silver

आजचा जळगावमधील सोने-चांदीचा भाव? Gold Silver Rate
आज गुरुवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,९८० रुपये इतका आहे. तर चांदी ६९,८६० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

---Advertisement---

रशिया युक्रेन युद्ध अजूनही सुरुच आहे. जवळपास या युद्धाला एक महिना होत आला आहे. गेले काही दिवस सोन्या-चांदीचे दर अस्थिर पाहायला मिळत आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत त्याच्या दरात अनेक वेळा चढ-उतार झाली. या कालावधीत सोन्याचे प्रतितोळा दर ३ ते ४ हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सध्या सोन्याचा दर प्रतितोळा ५२ हजाराच्यावर गेला आहे.

या महिन्याच्या ९ मार्च रोजी सोने ५५ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर गेले होते. गेल्या ऑगस्ट २०२० मध्ये ५६ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर गेला होता. त्यानंतर या महिन्यात सोन्याने पुन्हा उच्चांक गाठला होता. गेल्या आठवड्यात सोने दरात जवळपास १७०० ते १८०० रुपयाची घसरण झाली होती. तर चांदीच्या दरात जवळपास २१०० रुपयाची घसरण झाली.मात्र या आठवड्यात सोने आणि चांदी दोन वेळा स्वस्त तर दोन वेळा महागले आहे.

या आठवड्यातील दर?
जळगावमध्ये २१ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५२,६५० रुपये होते. तर २२ मार्च रोजी ५२,८७०, २३ मार्च रोजी ५२,५८० इतका आहे. तर दुसरीकडे २१ मार्च ला चांदी ६९,४७० प्रति किलो होती. २२ मार्च ६९,९५०, २३ मार्च ६९,२८० रुपये इतका आहे.

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---