सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले, चांदीत मोठी घसरण; असे आहेत नवीन दर?

फेब्रुवारी 24, 2026 11:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सोने-चांदीच्या भाव गगनाला भिडले असून दोन्ही धातूंचे दर कधी आवाक्याबाहेर येतील याची प्रतीक्षा सर्वसामान्य ग्राहक करीत आहे. मात्र या आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे चांदी दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. Gold Silver Price Today

gold silver rate jpg webp

काय आहेत सोन्याचे भाव?
आज मंगळवारी सकाळी बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४३० रुपयांनी वाढले होते. हे दर १,६१,७८० रुपये झाले होते. तर २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४०० रुपयांनी वाढून १,४८,३०० रुपये प्रति १० ग्रॅम इतके झाले आहेत. सोबतच १८ कॅरेट सोन्याचे दर ३३० रुपयांनी वाढून १,२१,३४० रुपये झाले आहेत.

Advertisements

आज सोने दरात वाढ झाली असली तरी दुसरीकडे चांदी दरात मोठी घसरण झाली आहे. आज चांदीचे दर प्रति किलो १५००० रुपयांनी घसरले असून २,८५,००० रुपयांवर पोहोचले आहे.

Advertisements

जळगावात सोने-चांदीत वाढ
जळगाव शहरातील सुवर्णबाजारात सोमवारी चांदीच्या भावात ९ हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ती २ लाख ६९ हजार रुपयर्यावर पोहोचली. सोन्याच्या भावात १ हजार १०० रुपयांची वाढ होऊन ते १ लाख ५८ हजार ५०० रुपयांवर पोहोचले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now