ग्राहकांना पुन्हा झटका ! एका दिवसात चांदी दीड हजार रुपयांहून अधिकने महागली, सोनेही वधारले..
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२३ । सोने आणि चांदीच्या (Gold-Silver Price Today किमतीत चढ-उताराचे सत्र सुरूच आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीला अच्छे दिन आले असून खरेदीसाठी इच्छूक ग्राहकांनाही स्वस्ताईचा लाभ मिळत आहे. फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात सोन्या-चांदीच्या दरांनी सर्वकालीन उच्चांक गाठला होता, मात्र तेव्हापासून आत्तापर्यंत दोन्ही मौल्यवान धातूंना विशेष कामगिरी बजावता आलेली नाही. दरम्यान, सततच्या घसरणीनंतर या आठवड्यात सोने-चांदीने उसळी घेतली. सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही धातूंच्या किमतीत वाढ झालेली दिसून येत असून चांदीचं किमतीने पुन्हा ७३ हजाराचा टप्पा गाठला आहे. एका दिवसात चांदी किमतीत तब्बल दीड हजार रुपयांहून अधिकची वाढ झालेली दिसून येतेय.
जागतिक घडामोडींमुळे सोने-चांदी दबावाखाली आल्यामुळे त्यांना मोठी उसळी घेण्याची संधी मिळाली नाही. सततच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीने दरवाढीचा बिगुल वाजवला आणि प्रति १० ग्रॅम ६० हजारांची पातळी गाठली.
जळगाव सुवर्णनगरीमधील दर
जळगाव सुवर्णनगरीत गेल्या आठवड्यात विनाजीएसटी सोन्याचा दर ५९ हजाराच्या खाली गेला होता.तर चांदीचा दर ७० हजाराच्या घरात होता. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीलापासून दोन्ही धातूंच्या किमती महाग झाल्या. सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएटी ५४,०५० रुपयावर गेला होता. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात हा दर ५३,८०० रुपयांवर होता. तर दुसरीकडे २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ६०,००० रुपायांवर गेला आहे. यापूर्वी हा दर काल ५८,८०० रुपयावर होता. त्यात २०० ते ३०० रुपयाची वाढ झालेली आहे. तसेच एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी ७३,००० रुपयांवर गेला आहे. काल सकाळी चांदीचा दर ७१,३०० इतका होता. म्हणजेच गेल्या २४ तासात चांदीच्या किमतीत १३०० ते १४०० रुपयाची वाढ झाली
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील दर
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज बुधवारी १०.३० वाजेपर्यंत सोने ऑक्टोबर फ्युचर्स (वायदे)चा दर ६४ रुपायांनी वाढून ५८,६३८ रुपयावर व्यवहार करत आहे. तर चांदीचा दर ३७४ रुपयांनी वाढून ७२,३५६ रुपयावर व्यवहार करत आहे.