जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२१ । गेल्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झालीय. जळगाव सराफ बाजारात सोने पन्नास हजाराच्या दिशेने जाऊ लागले आहे. तर चांदी चांदीचा भाव ६७ हजारांच्या उंबरवठ्यावर आला आहे. या आठवड्यात सोन्याच्या भावात सलग वाढ दिसून आलीय. तर चांदीच्या भावात मोठी वाढ झालीय. काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी जळगाव सराफ बाजार पेठेत सोने भाव स्थिर राहिला तर दुसरीकडे मात्र, चांदीच्या भावात १००० रुपयाची वाढ दिसून आलीय.
सध्या जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४९,५१० इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६६,९१० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.
एकीकडे भारतात ओमिक्रॉनसह कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे कच्च्या तेलाचा भाव सात वर्षांच्या उच्चांकी पातळीवर गेल्याने महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. महागाईपासून बचाव करणाऱ्या सोने आणि चांदीला मात्र तेजीचे वलय निर्माण झाले आहे. जळगाव बाजारात गेल्या पाच दिवसात चांदीच्या दरात ४१८० रुपयांनी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे या आठवड्यात सोने देखील महागले आहे. गेल्या पाच दिवसात सोने चार वेळा महागले आहे. त्यात ६१० रुपयाने सोने महागले आहे. गेल्या आठवड्यात देखील सोने आणि चांदी महागली होती. त्यावेळी सोने जवळपास ३०० रुपयांनी तर चांदी १६०० रुपयांनी महागली आहे. म्हणजेच गेल्या १५ दिवसांमध्ये चांदी तब्बल ५७०० रुपयांनी महागली आहे.
या आठवड्यातील दर?
१७ जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,९०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०५० रुपये असा होता. १८ जानेवारी (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०४० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,३५० रुपये इतका नोंदविला गेला. १९ जानेवारी (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६४,५०० रुपये इतका नोंदविला गेला. २० जानेवारी (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,५१० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६५,९१० रुपये इतका नोंदविला गेला
सोन्याची शुद्धता कशी तपासायची
24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिले आहे.
22 कॅरेटच्या दागिन्यांवर 916 लिहिले आहे.
21 कॅरेट सोन्याच्या ओळखीवर 875 लिहिले जाईल.
18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 लिहिले आहे.
14 कॅरेटच्या दागिन्यांवर 585 लिहिले आहे.
हे देखील वाचा :
- बाबो..! जळगाव सुवर्णपेठेत सोन्याने गाठला 80 हजाराचा टप्पा; भाव आणखी वाढणार का?
- सोन्याने घेतली उंच भरारी, चांदी देखील महागले,बघूया काय आहेत आजचे भाव…
- बोंबला! आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर सोने चांदीचे दर पुन्हा विक्रमी दिशेकडे.. आताचे भाव पाहिलेत का?
- ग्राहकांना दिलासा! सोने चांदी पुन्हा घसरली..आता कुठपर्यंत आले दर??
- आजचा सोने चांदीचा भाव ; कुठपर्यंत आला दर? तपासून घ्या