जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२१ । अक्षय तृतीयाचा सण होताच जळगावातील सुवर्णबाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळाल आहे. सततच्या भाव वाढीने सोने ४९ हजाराच्या दिशेने जाऊ लागले आहे. तर चांदी देखील मोठा बदल पाहायला मिळाला आहे.
दरम्यान, आज शुक्रवारी सोन्याचा भावात प्रति १० ग्रम १६० रुपयाची वाढ झाली आहे तर आज चांदी स्थिर आहे.
सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९०७ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,०७० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,६७३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४६,७३० रुपये मोजावे लागतील.
चांदीचा भाव
तर आज चांदीचा दर स्थिर आहे. आज १ ग्राम चांदीचा भाव आज ७७.५ रुपये इतका असून १ किलोचा दर ७७,५०० रुपये इतका आहे. मागील गेल्या १० दिवसात चांदीच्या भावात तब्बल ६ हजाराची वाढ झाली आहे.