⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | Gold-Silver Rate : सोने स्वस्त, चांदीही झाली स्वस्त, वाचा आजचा भाव

Gold-Silver Rate : सोने स्वस्त, चांदीही झाली स्वस्त, वाचा आजचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । आज सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) भावात किंचित घसरण झालीय.आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात किंचित ६० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या प्रति किलोच्या भावात २० रुपयाची घसरण झाली आहे. देशात लग्नसराईचा हंगाम असल्याने सोन्याची मागणी वाढत असून त्याचा परिणाम किंमतीवर होत आहे. सोने आणि चांदी दोन्हींची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

जळगाव सराफ बाजारात गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहारात सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) दरात मोठी वाढ नोंदविली गेली. १० ग्रॅम सोन्याच्या दरात ५८० रुपयाची वाढ झाली होती, तर दुसरीकडे चांदीच्या प्रति किलोच्या दरात तब्बल १९९० रुपयाची वाढ झाली होती.

जळगावातील आजचा सोने-चांदीचा भाव? (Gold-Silver Rate)

आज जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४९,७३० रुपये इतका आहे. तर चांदीचे दर किलोमागे ६३,५९० इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

बाजार गडगडला

दरम्यान, आज आठवड्याच्या पहिल्याच सत्रातील सुरुवातीच्या काही मिनिटांत भांडवली बाजार गडगडला. ओमिक्राॅनचा फैलाव आणि पुन्हा लॉकडाऊनचे संकट याने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी चौफेर विक्री केली. या धामधुमीत सेन्सेक्स तब्बल ११०० अंकांवर कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३६० अंकांनी आपटला.

बाजारातील पडझडीमुळे सोने चांदीच्या भावावर देखील परिणाम दिसून येऊ शकतो. गेल्या आठवड्यात सोने ४ वेळा महागले तर एक वेळा स्वस्त झाले आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात ७३० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी देखील वाधरली आहे. चांदीच्या भावात जवळपास १४०० रुपयाची वाढ झाली आहे.

गेल्या आठवड्यातील सोने चांदीचे दर?

१३ डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,५८० रुपये असा होता. १४ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,४४० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,०३० रुपये इतका नोंदविला गेला. १५ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,२४० रुपये इतका नोंदविला गेला. १६ डिसेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२१० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६१,६२० रुपये इतका नोंदविला गेला. १७ डिसेंबर (शुक्रवार २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४९,७९० रुपये इतका आहे. तर चांदीचे दर किलोमागे ६३,६१० इतका आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.