⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | सोने स्वस्त, चांदीचा भावही घसरला, वाचा आजचे दर ; २ डिसेंबर २०२१

सोने स्वस्त, चांदीचा भावही घसरला, वाचा आजचे दर ; २ डिसेंबर २०२१

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२१ । जगभरात नव्या विषाणूने प्रचंड खळबळ माजली असून यामुळे सोने आणि चांदी पुन्हा महागणार असल्याची चर्चा आहे. मात्र, सराफ बाजारात फारसा काही बदल दिसून आलेला नाहीय. काल  जळगाव सराफ बाजारात डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात किंचित २० रुपयाची वाढ दिसून आली होती. तर आज सोन्याच्या भावात किंचित घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदी देखील स्वस्त झाली आहे. आज सोने ३० रुपयाने तर चांदी १९० रुपयाने स्वस्त झाली आहे.

आजचा जळगावातील सोने-चांदीचा भाव :

आज मंगळवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,६९० रुपयांवर गेला आहे. तर चांदी भाव १० रुपयांनीवाढून ६२,९०० प्रति किलो इतक्यावर आला आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या ‘ओमिक्राॅन’ वेरिएंटमुळे ओमिक्राॅनचा जगभरात दहशत पसरली आहे. बड्या देशांनी ओमिक्राॅनचा फैलाव रोखण्यासाठी लाॅकडाऊनची तयारी सुरु केली आहे. यामुळे पुन्हा अर्थव्यवस्था संकटात जाईल या भीतीने गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीकडे धाव घेतली आहे. असं असलं तरी सोने आणि चांदीच्या भावात किंचित चढ-उतार दिसून येत आहे.  गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात १६०० रुपयांची घसरण दिसून आली. तर दुसरीकडे चांदीचा भावात ३५०० हजाराची घसरण दिसून आली

२९ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,५०० रुपये असा होता. ३० नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०८० रुपये असा होता. १ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७२० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०९० रुपये इतका आहे.  २ नोव्हेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,६९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,९०० रुपये इतका आहे.

दरम्यान, देशातील 256 शहरांमध्ये हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकण्यावर आता कारवाई सुरू झालीय. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ने हॉलमार्क नसलेल्या सोन्याचे दागिने बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केलीय. देशात सोन्याच्या दागिन्यांवर नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू करण्यात आलाय.

ज्वेलर्सला दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो

22 कॅरेट सोने असल्याचे भासवून 18 कॅरेट सोने विकल्यास ज्वेलर्सला दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो. ग्राहकांची होणारी फसवणूक पाहता केंद्र सरकारने गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी नवे कायदे आणलेत. सोन्याचे दागिने आणि कलाकृतींसाठी हॉलमार्क प्रणालीही देशात लागू करण्यात आलीय. नवीन ग्राहक कायदा लागू झाल्यानंतर आता हॉलमार्किंगचे नियम पाळणे अधिक कडक होणार आहे.

हॉलमार्क पाहून खरेदी करण्याचा फायदा असा आहे की, नजीकच्या भविष्यात जेव्हा तुम्ही ते विकायला जाल तेव्हा तुम्हाला कमी किंमत मिळणार नाही, परंतु तुम्हाला सोन्याची खरी किंमत मिळेल.

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.