वाणिज्य

दिवाळीत सोने होणार स्वस्त? त्वरित जाणून घ्या आजचा प्रति 10 ग्रॅमचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । जागतिक बाजारात सध्या सुरू असलेल्या अस्थिरतेचा परिणाम दिसून येत आहे. दिवाळीपूर्वीच देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत घट झाली आहे, तर चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. दिवाळी संपूर्ण देशात साजरी केली जाते आणि या काळात लोक सोने-चांदीची खरेदी करतात. अशा स्थितीत सर्वांचे सोन्या-चांदीच्या दराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यावेळी दिवाळीत सोने स्वस्त होऊ शकते, असे मत तज्ज्ञांनी वर्तविला आहे. Gold Silver Price Today

आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?
आज मंगळवार, 18 ऑक्टोबर रोजी सोन्या-चांदीने एमसीएक्सवर घसरणीसह व्यवहार सुरू केला, परंतु थोड्याच वेळात चांदीने वाढ केली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर दुपारी 12.30 वाजता, सोन्याचा फ्युचर्स भाव 23 रुपयांनी घसरून 50,450 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीचा भाव 218 रुपयांनी वाढला. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव 56,525 वर व्यवहार करत आहे. दरम्यान, MCX वर गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत जवळपास 1200 ते 1300 रुपयांची घसरण दिसून आली. तर चांदीच्या किमतीत जवळपास 3900 ते 4000 रुपयाची घसरण दिसून आली. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

जळगाव सुवर्णनगरीतील भाव?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,800 रुपयांपर्यंत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51,000 रुपये इतका आहे. चांदीचा प्रति किलोचा दर 56,200 रुपये इतका आहे. जळगावात गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत जवळपास 900 ते 1000 रुपयाची घसरण दिसून आली. तर चांदीच्या भावात 3500 रुपयापर्यंतची घसरण दिसून आली.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button