जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । ओमिक्राॅनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीमध्ये वाढ झाली आहे. जळगाव सराफ बाजारात काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) दरात मोठी वाढ नोंदविली गेली. काल १० ग्रॅम सोन्याच्या दरात ५८० रुपयाची वाढ झाली, तर दुसरीकडे चांदीच्या प्रति किलोच्या दरात तब्बल १९९० रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं पुन्हा वरच्या दिशेने जाऊ लागले आहे.
जळगावातील आजचा सोने-चांदीचा भाव? (Gold-Silver Rate)
सध्या जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४९,७९० रुपये इतका आहे. तर चांदीचे दर किलोमागे ६३,६१० इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.
एकीकडे ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीचे भाव वधारत असून त्यात सध्या सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ झाल्याने देखील भाव वाढत असल्याचे सांगितले आहे. या आठवड्यात सोने ४ वेळा महागले तर एक वेळा स्वस्त झाले आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात ७३० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी देखील वाधरली आहे. चांदीच्या भावात जवळपास १४०० रुपयाची वाढ झाली आहे.
दरम्यान, वाणिज्य मंत्रालयाकडून सोन्यावरील आयात करात घट करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोनं खरेदी आता लवकरच आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सध्या सोन्यावर 7.5 टक्के आयात शुल्क आकारले जाते. त्यामध्ये घट करून ते 4 टक्क्यांपर्यंत कमी करावे असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सोन्यावरील आयात शुल्क कमी केल्यास सोन्याचे दर थेट 3.5 टक्क्यांनी कमी होणार आहेत.
पूर्वी सोने-चांदी सारख्या मौल्यवान धातुंवर 12.5 टक्के आयात शुल्क आकारले जात होते. त्यानंतर त्यामध्ये कपात करण्यात आली.
या आठवड्यातील सोने चांदीचे दर?
१३ डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,५८० रुपये असा होता. १४ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,४४० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,०३० रुपये इतका नोंदविला गेला. १५ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,२४० रुपये इतका नोंदविला गेला. १६ डिसेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२१० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६१,६२० रुपये इतका नोंदविला गेला. १७ डिसेंबर (शुक्रवार २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४९,७९० रुपये इतका आहे. तर चांदीचे दर किलोमागे ६३,६१० इतका आहे.