जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२१ । कोरोना डेल्टा व्हेरिएंटचा धोका असला तरी भांडवली बाजारात तेजी असल्याने सोन्यातील गुंतवणुकीचा ओघ कमी झाला आहे. आज शुक्रवारी जळगाव सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. या महिन्यातील ही सर्वात मोठी घसरण झाली आहे.
आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याची किंमत ८४० रुपयांनी घसरली आहे. त्याचबरोबर या चांदीच्या दरात प्रति किलो २२७० रुपयांची घसरण झाली आहे. त्यापूर्वी काल सोने ३७० रुपयाने घसरले होते तर चांदी प्रति किलो ३०० रुपयाने स्वस्त झाली होती. आज जळगाव सराफ बाजारात (१७ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,१६० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६२,५१० रुपये नोंदवले गेले.
गुरुवारी (१६ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,००० होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४५,२२० रुपयांवर गेले होते. बुधवारी (१५ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,३७० होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४५,४८० रुपयांवर गेले होते. मंगळवारी (१४ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,०१० होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४५,१८० रुपयांवर गेले होते. सोमवारी (१३ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,९०० होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४५,२०० रुपयांवर गेले होते. रविवारी हेच दर कायम होते.
तर सोमवारी चांदी प्रति किलो ६५,०८० रुपये इतका होता. मंगळवारी चांदी प्रति किलो ६४,७८० रुपये इतका होता.बुधवारी ६५,०८०, गुरुवारी ६४,७८० तर आज पुन्हा मोठी घसरण झाल्याने चांदी प्रति किलो ६२,५१० रुपये इतके आहे. या आठवड्यात चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आलीय. गेल्या पाच दिवसात चांदीचा भाव अडीच हजाराहून अधिकने कमी झाली आहे.
दरम्यान, आता आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करत आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.
‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं
सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढंच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोनं साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.