वाणिज्य

सोने-चांदी खरेदीला मोजावे लागतील जास्त पैसे, आज ‘इतक्या’ रुपयांनी महागले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । सोने आणि चांदीच्या किमतीत दर-उतार सुरूच आहे. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली. मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जागतिक संकेतांमुळे, भारतीय वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, आज सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात सोन्याच्या किमतीत 152 रुपयाची वाढ दिसून येतेय. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत 429 रुपयाची वाढ झाली आहे.

MCX वर काय आहे सोने चांदीचा भाव?
आज सोमवारी, MCX वर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव सकाळी 10 वाजता 152 रुपयांनी वाढून 50,412 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. सोन्याप्रमाणेच आज वायदे बाजारात चांदीच्या दरातही वाढ झाली. आज चांदीचा दर 429 रुपयांनी वाढून 55,655 रुपयांवर पोहोचला आहे. आज चांदीचा व्यवहार 57,697 रुपयांपासून सुरू झाला. एकदा किंमत 55,597 रुपयांपर्यंत गेली. पण, काही काळानंतर तो 55,655 रुपयांवर व्यवहार करू लागला. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

MCX वर गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत जवळपास 1200 ते 1300 रुपयांची घसरण दिसून आली. तर चांदीच्या किमतीत जवळपास 3900 ते 4000 रुपयाची घसरण दिसून आली.

जळगाव सुवर्णनगरीतील भाव?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,800 रुपयांपर्यंत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51,100 रुपये इतका आहे. चांदीचा प्रति किलोचा दर 56000 रुपये इतका आहे. जळगावात गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत जवळपास 900 ते 1000 रुपयाची घसरण दिसून आली. तर चांदीच्या भावात 3500 रुपयापर्यंतची घसरण दिसून आली.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

धनत्रयोदशी-दिवाळीला सोने खरेदीवेळी या गोष्टी लक्ष्यात ठेवा..
दिवाळीचा (Diwali 2022) सण 21 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी लगबग पाहायला मिळतेय. दरम्यान, तुम्हीही सोने खरेदी करत असाल तर या गोष्टी लक्ष्यात ठेवा..
सोने खरेदी करताना रोखीने पैसे देण्याऐवजी क्रेडिट, डेबिट किंवा UPI द्वारे पैसे देण्याचा प्रयत्न करा. सोने खरेदी केल्यानंतर त्याचे निश्चित बिल घ्या.सोने खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी अनेक गोष्टी व्यवस्थित तपासल्या पाहिजेत कारण अनेक वेळा दुकानदार जीएसटी चार्ज, मेकिंग चार्जच्या नावाखाली ग्राहकांकडून जास्त पैसे घेतात. त्यामुळे अनेक वेळा बनावट सोने खरेदी करून फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात लोक अडकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला अशा फसवणुकीपासून स्वतःला सुरक्षित ठेवायचे असेल, तर सोने खरेदी करताना आम्ही दिलेल्या गोष्टीचे अनुसरण करा.
सोने खरेदी करताना नेहमी प्रमाणित दुकानातून सोने खरेदी करा. याच्या मदतीने तुम्हाला फक्त शुद्ध आणि चांगल्या दर्जाचे सोने मिळते. सोने खरेदी करताना हॉलमार्क नक्की तपासा. तो सोन्याच्या शुद्धतेचा पुरावा आहे.
सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्या शहरातील सोन्याची किंमत नक्की तपासा. लक्षात ठेवा की सोन्याची किंमत तुम्ही 24K, 22K किंवा 18K सोने खरेदी करणार आहात यावर अवलंबून असते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button