---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

उच्चांक पातळीवरून चांदी ५००० रुपयांनी घसरली, सोनेही घसरले ; आजचे दर तपासून घ्या..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२३ । सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार कायम आहे. काल सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतीत किंचित घसरण झाल्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा घसरण झालेली दिसून येत आहे. घसरण झाली असली तरी सोन्याचे भाव अजूनही 61 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर आहेत. तर दुसरीकडे चांदी किमतीत देखील आज घसरण झालेली दिसून येत आहे.

gold silver rate 1

मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवरील आज दर?
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी १० वाजेपर्यंत सोन्याचा भाव ८० रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे प्रति तोळ्याचा सोन्याचा दर ६०,९४० रुपयावर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे आज चांदीच्या किमतीत २३० रुपयाची घसरण झाल्यानंतर चांदीचा एक किलो दर ७३,१७४ रुपयावर व्यवहार करत आहे.

---Advertisement---

सोने उच्चांक पातळीवरून अद्यापही ६०० ते ६५० रुपयांनी स्वस्त होत आहे. यापूर्वी, ४ मे २०२३ रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव ६१,६४६ रुपये (विनाजीएसटी) प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. दुसरीकडे, चांदीही जवळपास ५००० हजार रुपयांनी आपल्या सार्वकालिक उच्चांकाच्या खाली आहे. ४ मे २०२३ रोजी चांदीने ७७००० रुपयांचा (विनाजीएसटी) सार्वकालिक उच्चांक गाठला.

जळगावातील आजचा सोने-चांदीचा दर?
जळगाव सराफ बाजारात सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर ६१,३०० रुपये इतका आहे. तर चांदीचा एक किलोचा दर ७३,४०० रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. सोने-चांदीचे दर कर न लावता मोजले गेले आहेत. सोन्यावरील जीएसटी चार्जेस वेगळे भरावे लागतात. याशिवाय दागिन्यांवर मेकिंग चार्जही आहे.

अॅपद्वारे शुद्धता तपासा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---