⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

सोने 1036 रुपयाने, तर चांदी 3600 रुपयांनी महागली, जळगावात प्रति तोळ्याचा दर काय?

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२३ । सोने चांदीच्या किमतीत चढ-उतार दिसून येत आहे. मागील काही दिवसाच्या वाढीनंतर या आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीत घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. तीन दिवसापूर्वी घसरण झालेल्या दरात पुन्हा तेजी आली आहे. जळगाव सराफ बाजारात बुधवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात जवळपास १०३६ रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरातही तब्बल ३६०० रुपयापर्यंतची वाढ झाली आहे. Gold Silver Price 16 December 2023

या आठवड्यात तीन दिवस भावात मोठी घसरण झाली. मात्र गुरुवारपासून मौल्यवान धातूच्या किंमतीत जोरदार उसळी आली. काही दिवसांत सोने पुन्हा रेकॉर्ड करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.ऐन लग्नसराईत दरात वाढ झाल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले.

या आठवड्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत सोने ६०० रुपयापर्यंत घसरले होते. सोमवारी, ११ आणि १२ डिसेंबर रोजी सोने प्रत्येकी २२० ते २४० रुपये,तर बुधवारी १३ डिसेंबर रोजी १०० ते १५० रुपयांनी उतरले. मात्र गुरुवारी सोन्यात १ हजार रुपयांची वाढ झाली. १५ डिसेंबर रोजी गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी सोने २०० रुपयांनी घसरले.

यामुळे जळगावात सध्या २२ कॅरेट सोने विनाजीएसटी ५७,४०० रुपये प्रति 10 ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ६२,७०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा भाव ६४,५९० रुपयावर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीचा दर आता विनाजीएसटी ७५,००० रुपये प्रति किलो इतका आहे. तर जीएसटीसह ७७,२५० रुपयांवर विकला जात आहे. दरम्यान, तीन दिवसात चांदीत