---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

दसऱ्यापूर्वीच सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ ; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचा प्रति ग्रॅमचा दर

gold rate (2)
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणारा दसऱ्याचा सण जवळ येऊन ठेपला आहे. यादिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. परंतु दसऱ्याच्या आधीच सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये आज सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. तर आज चांदीच्या घसरणीला ब्रेक लागला आहे.

gold rate (2)

जळगाव सराफ बाजारात आज गुरुवारी प्रति १० ग्रॅम सोन्याच्या भावात ७४० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदी प्रति किलो १३३० रुपयाने महागली आहे. त्यापूर्वी काल बुधवारी प्रति १० ग्रॅम सोन्याच्या भावात १५० रुपयाची वाढ झाली होती. तर चांदी प्रति किलो १६० रुपयाने स्वस्त झाली होती.

---Advertisement---

आजचा सोने आणि चांदीचा भाव

जळगाव सराफ बाजारात मागील गेल्या आठवड्यापासून सोन्याचे भाव वाढत आहे. सणासुदीत भाव कमी होतील अशी अपेक्षा असताना मात्र त्यात वाढ होत राहिली आहे. आज प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४९,०४० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६४,३६० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

गेल्या काही दिवसापासून सोने व चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार सुरू आहे. जळगाव सराफ बाजारात मागील महिन्यात २९ आणि ३० सप्टेंबरला सोन्याचा भाव ४७ हजाराखाली आला होता. २९ सप्टेंबरला प्रति १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४६,९३० रुपये तर ३० सप्टेंबर रोजी ४६,६५० रुपये प्रति तोळा इतका होता. परंतु त्यानंतर सोन्याचे दर सातत्याने वाढत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीलाच सोन्याच्या भावात मोठी वाढ नोंदविली गेली होती. ३० सप्टेंबर ते आज १४ ऑक्टोबर पर्यंत सोन्याच्या भावात २३४० रुपयाची वाढ झाली आहे.

दुसरीकडे चांदी देखील महागली आहे. ३० सप्टेंबरला चांदी प्रति किलो ६० हजार रुपयाखाली आली होती. परंतु चांदीत देखील सातत्याने वाढ झाली. ३० सप्टेंबर ते आज १४ ऑक्टोबरपर्यंत चांदीच्या भावात ४६१० रुपयाची मोठी वाढ झाली आहे.

रेकॉर्ड स्तरापेक्षा ७१६० रुपयांनी स्वस्त

गेल्यावर्षी सोन्याच्या किंमतीने ५६२०० रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्या स्तरापेक्षा सोने सध्या ७१६० रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, आगामी काळात सोन्याचा भाव पुन्हा वाढेल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे.

कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डॉलर आणि बॉण्ड्सवरील व्याज वाढल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव आहे. आगामी काळातही हा दबाव कायम राहील. मात्र, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे जगातील महागाईचा दर (Inflation Rate) वाढेल. अशा स्थितीत सोन्याची मागणी पुन्हा वाढेल आणि किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सोन्याचे भाव वाढण्याचा ट्रेंड पुन्हा सुरू होऊ शकतो. सणासुदीचा हंगाम जवळ आल्याने मागणीही वाढेल आणि किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी सध्याचा काळ अत्यंत योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दिवाळीपर्यंत सोनं 49 हजारांवर
सध्या सोनं 45 ते 46 हजार रुपये प्रतितोळा या पातळीवर आहे. ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे. पुढील तीन महिन्यांत येथून सोन्याच्या किंमतीत 4-5 हजारांपर्यंत वाढ शक्य आहे. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंटचे अभिषेक चौहान यांच्या अंदाजानुसार दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 49 हजारापर्यंत पोहोचू शकतो.

पुढील तीन महिन्यांत चांदीचा भाव सध्याच्या पातळीपासून 10 हजारांपर्यंत वर जाऊ शकतो. गेल्या आठवड्यात, मार्च 2022 च्या डिलिव्हरीसाठी चांदीचा बंद भाव 60,967 रुपये प्रति किलो होता.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---