जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२२ । आंतरराष्ट्रीय साेने बाजारातील दराच्या पडझडीने भारतीय सुवर्ण बाजारात साेन्याच्या दरात घसरण झाली आहे. सलग तिसऱ्या आठ्वड्यात जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीचे दर घसरले आहे. शुक्रवारी जळगाव सराफ बाजरात जवळपास साेन्याच्या दरात ८०० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे सोने प्रतीताेळा ५१,३०० रुपायांवर आले आहे. सोन्याचे दर दिवसांतून दोनदा बदलतात. त्यामुळे अनेकदा सोन्याच्या दरात तफावत आढळून येते. आज चांदीच्या दरात देखील घसरण झाली असून, चांदीचे दर प्रति किलो ६०,००० रुपयांवर पोहोचले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्याच्या दरात घसरण सुरू असल्याने सोने खरेदी वाढली आहे. सध्या लग्न सराईचा हंगाम सुरू आहे. त्याची देखील सोने चांदीच्या खरेदीला मोठी मदत होते. लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात सोने चांदीची खरेदी होत असते. त्यात काही दिवसांपासूनची होत असलेल्या घसरणीचा खरेदीदारांना संधी मिळत आहे.
रशिया युक्रेन युद्ध दरम्यान ९ मार्चला सोन्याच्या प्रति तोळ्याचा भाव ५५,५५० रुपयावर गेला होता. तर चांदी ७३ हजार रुपयांवर गेली होती. त्यानंतर दोन्ही धातूंचे भाव कमी होत गेले. चांदीचा दर वेगाने स्वस्त होत आहे. यापूर्वी पहिला कोरोना लॉकडाऊन लागण्यापूर्वी चांदीचा प्रति किलोचा दर हा ३६ हजार ते ३७ हजार रुपये इतका होता. मात्र लॉकडाऊननंतर चांदीच्या दर सोन्यापेक्षी अधिकने वाढला होता.
चांदीचा सार्वधिक दर हा ८ ऑगस्ट २०२० मध्ये नोंदविला गेला आहे. त्यावेळी चांदीचा प्रति किलोचा दर हा ८१,६७० रुपयांवर पोहोचला होता.तर दुसरीकडे सोने ५६ हजारांवर गेले होते. त्यानंतर चांदीचा दर ०३ ऑक्टोबर २०२० रोजी ६१ हजारांवर आला होता. मात्र त्यानंतर चांदीचा दर पुन्हा वाढत गेला.दरम्यान, आता चांदीचा दर ८ महिन्याच्या निच्चांकीवर आला आहे. आजच्या घसरणीनंतर चांदी ६१ हजाराच्या खाली आलीय. तर सोने ५२ हजाराच्या खाली आलेय.
या आठवड्यात सोने ३ वेळा स्वस्त तर २ वेळा महागले आहे. तर चांदी देखील ३ वेळा स्वस्त तर २ वेळा महागली आहे. या ५ दिवसात चांदी तब्बल ४ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर सोने १२०० ते १२५० रुपयांनी स्वस्त झाले आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात सोने ८५० ते ९०० रुपयांनी स्वस्त झाले. तर चांदी २६००० ते २७०० रुपयापर्यंत घसरली आहे.
या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
९ मे २०२२- रुपये ५२,५५० प्रति १० ग्रॅम
१० मे २०२२ – रुपये ५२,१५० प्रति १० ग्रॅम
११ मे २०२२ – रु ५२,७७० प्रति १० ग्रॅम
१२ मे २०२२- रु ५२,०१० प्रति १० ग्रॅम
१३ मे २०२२- रु ५१,६३५० प्रति १० ग्रॅम
या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
९ मे २०२२- रुपये ६४,०१० प्रति किलो
१० मे २०२२ – रुपये ६२,९४० प्रति किलो
११ मे २०२२- रुपये ६२,०४० प्रति किलो
१२ मे २०२२- रुपये ६२,१८० प्रति किलो
१3 मे २०२२- रुपये ६०,१३० प्रति किलो
शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.