⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

Gold Silver Price : खरेदीची संधी.. सोने-चांदी पुन्हा निच्चांकी पातळीवर, वाचा आजचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२२ । रशिया युक्रेन युद्धाच्या दरम्यान, उच्चांकावर गेलेले सोने आता पुन्हा निच्चांकी स्थरावर येऊ लागले आहे. मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे भाव सातत्याने घसरत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आज बुधवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात ३८० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदी ९०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोने ४०० रुपयाने तर चांदी १०७० रुपायांनी स्वस्त झाली होती.

आजच्या घसरानंतर जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,७७० रुपये इतका आहे. तर दुसरीकडे चांदीचा प्रति किलो ६२,०४० रुपये इतकी आहे. दरम्यान, सोन्याच्या किमती या दिवसातून दोनदा जाहीर होतात. तसेच सोन्याची किंमत ही सोने अधिक दागिण्याच्या घडणावळीचा खर्च यावर अवलंबून असल्यामुळे भावात शहारानुसार तफावत आढळून येते.

रशिया युक्रेन युद्ध दरम्यान ९ मार्चला सोन्याच्या प्रति तोळ्याचा भाव ५५,५५० रुपयावर गेला होता. तर चांदी ७३ हजार रुपयांवर गेली होती. त्यानंतर दोन्ही धातूंचे भाव कमी होत गेले. गेल्या दोन आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली. गेल्या दोन दिवसात सोने ७०० ते ८०० रुपायांनीं स्वस्त झाले आहे. तर चांदी दरात २ हजार रुपयांपर्यंतची घसरण झाली आहे.

गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
२ मे २०२२- रुपये ५२,९७० प्रति १० ग्रॅम
३ मे २०२२ – रुपये ५१,८५० प्रति १० ग्रॅम
४ मे २०२२ – रु ५२,००० प्रति १० ग्रॅम
५ मे २०२२- रु ५१,८०० प्रति १० ग्रॅम
६ मे २०२२- रु ५२,०९० प्रति १० ग्रॅम
७ मे २०२२- बाजार सुट्टी
८ मे २०२२- बाजार सुट्टी

गेल्या एका आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
२ मे २०२२- रुपये ६५,०५०प्रति किलो
३ मे २०२२ – रुपये ६३,७४० प्रति किलो
४ मे २०२२- रुपये ६३,९५० प्रति किलो
५ मे २०२२- रुपये ६३,५७० प्रति किलो
६ मे २०२२- रुपये ६३,८०० प्रति किलो
७ मे २०२२- बाजार सुट्टी
८ मे २०२२- बाजार सुट्टी

शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.