⁠ 
शनिवार, जून 15, 2024

खरेदीदारांना लॉटरी! आठवड्याभरात अचानक सोने ‘इतक्या’ रुपयांनी घसरले, आताचा 10ग्रॅमचा दर पहा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२३ । सततच्या वाढीनंतर आता सोन्याच्या दरात नरमाई दिसून येत आहे. या आठवड्यात सोन्याच्या किमतीत घसरण झाली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सोन्याचा भाव 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली आला आहे. या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव 59,960 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. त्याच वेळी, गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव 60,322 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता.

म्हणजेच या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 362 रुपयांनी घट झाली आहे. या आठवड्यात मंगळवारी सोन्याची सर्वात महाग किंमत 60,003 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि गुरुवारी सर्वात कमी किंमत 59,570 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी होती. दिवसभरात दोन वेळा सोन्या चांदीचे दर जाहीर करण्यात येतात. त्यानुसार, सकाळून एक भाव असेल तर संध्याकाळी तुम्हाला सोन्या चांदीच्या भावात फरक जाणवू शकतो.

आठवडाभर सोन्याचा भाव असाच राहिला
IBJA दरांनुसार, या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी सोन्याचा भाव 59,601 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी भावात वाढ झाली आणि 60 हजार रुपयांचा आकडा ओलांडल्यानंतर तो प्रति 10 ग्रॅम 60 हजार 35 रुपयांवर बंद झाला. बुधवारी सोन्याचा दर 59,957 रुपये आणि गुरुवारी 59,570 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. शुक्रवारी सोने किंचित महाग झाले आणि 59,960 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले.

वर्षभरात सोने-चांदी इतक्या रुपयांनी वाढली?
यंदाच्या एप्रिल महिन्यापर्यंत सोने-चांदी झपझप चढले. मे महिन्यात तर सोने-चांदीने किंमतीचे सर्व रेकॉर्ड तोडले. सोने एकाच वर्षात जवळपास 10,000 रुपयांनी वधारले. तर चांदी किलोमागे जवळपास 17000 रुपयांनी महागली आहे. या जून महिन्यातच सोन्यात हजार रुपयांहून अधिकची पडझड झाली. तर चांदीच्या किंमती पण मोठ्या प्रमाणात वाढल्या नाहीत.