सोने पुन्हा महागले, मात्र चांदी झाली स्वस्त, वाचा काय आहे नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२२ । दिवाळी सण होताच सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ होताना दिसतेय. मागील काही दिवसापासून सोने चांदीचे दर एका विशिष्ठ पातळीवरून वर खाली होत आहे. आज सोन्याच्या किमतीत वाढ झालेली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत घसरण झालेली दिसून येतेय. आज गुरुवारी सुरुवातीच्या व्यापारात मल्टी कमोडिटी एक्स्चेंज MCX वर सोन्याची किंमत 0.10 टक्क्यांनी वाढली आहे. त्याच वेळी, चांदीचा दर आज एमसीएक्सवर 0.34 टक्क्यांनी तुटला आहे. Gold Silver Rate Today

आज गुरुवारी, वायदे बाजारात २४ कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत सकाळी 9.30 वाजता 54 रुपयांनी वाढून 51,560 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. सोन्याचा भाव आज 51,541 रुपयांवर उघडला गेला. एकदा उघडल्यानंतर तो 51,568 रुपयांवर गेला. पण, काही काळानंतर किंमत 51,560 रुपयांपर्यंत घसरली.

आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. चांदीचा दर आज 208 रुपयांनी घसरून 61,353 रुपयांवर आला आहे. चांदीचा भाव 61,360 रुपयांवर उघडला होता. एकदा किंमत 61,393 रुपयांवर गेली. नंतर मागणी कमी झाल्याने किमतीत थोडी घसरण झाली आणि चांदीचा भाव ६१,३५३ रुपयांवर सुरू झाला.

जळगाव सुवर्णनगरीतील दर?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,500 रुपायांवर गेला आहे. तर दुसरीकडे चांदीचा भाव 61,000 वर गेला आहे. गेल्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झालेली दिसून येतेय.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)