वाणिज्य

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या किमतीत मोठा बदल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२२ । दिवाळीत सोन्याच्या विक्रमी विक्रीनंतर लोकांच्या नजरा त्याच्या किमतीकडे लागल्या आहेत. दिवाळीनंतर सोने आणि चांदीचे दर एका विशिष्ट पातळीवरून वर-खाली होत आहे. आज नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच तारखेला सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. आज मंगळवारी सोने किंचित महागले आहे. तर दुसरीकडे मात्र,चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आजच्या दरवाढीने चांदी 58 हजारांवर गेली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 11 वाजेला 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव किंचित 10 रुपयांनी वाढून घसरून 50,329 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. सोन्याचा दर आज 50,351 रुपयांवर उघडला गेला. एकदा उघडल्यानंतर तो 50,283 रुपयांपर्यंत गेला. पण काही काळानंतर त्यात वाढ दिसून आली. दुसरीकडे आज चांदी तब्बल 612 रुपयांनी वाढून 58,290 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा भाव 57,960 रुपयांवर उघडला होता. मात्र नंतर त्यात वाढ झाली.

दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

जळगाव सुवर्णनगरीतील दर?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या सध्या सोन्याचा भाव जवळपास 50,600 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर सध्या चांदीचा प्रति किलोचा दर 58,000 रुपयापर्यंत आहे.मागील दोन तीन दिवसात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आलीय. दिवाळीपूर्वी सोन्याच्या भाव 51 हजाराखाली आला होता.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button