---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

सोने महागले तर चांदीत मोठी घसरण ; तपासा आजचे जळगावमधील दर

gold silver
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ मे २०२१ । मागील काही दिवसापासून  सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसून येत आहे.  लॉकडाऊनमुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. दरम्यान, आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सुवर्णनगरी जळगावात आज सोने प्रति १० ग्रम ११० रुपयाने वाढले आहे. तर आज चांदीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. चांदी आज तब्बल ११०० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

gold silver

आजचा सोन्याचा भाव

---Advertisement---

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ११ रुपयांनी महागले असून प्रति एक ग्रम ४,७३९ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,३९० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,५१३ रुपये इतका आहे. त्यात प्रति ग्रम १० रुपयांची महाग झाले असून १० ग्रामसाठी तुम्हाला ४५,१३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव 

आज चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. आज (०७ मे)चांदीच्या भावात ११०० रुपयांची घसरण झाली असून १ ग्राम चांदीचा भाव ७४.२ रुपये इतका असून १ किलोचा दर ७४,२०० रुपये इतका आहे.

दरम्यान, कोरोनामुळे जगभर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे शेअर बाजारांत घसरण होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार तेथून गुंतवणूक काढून सोनेखरेदीवर भर देत आहेत. त्यामुळे सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---