जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जून २०२१ । सोने आणि चांदीमध्ये होत असलेल्या नफावसुलीने दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण झाली आहे. जळगावच्या सुवर्णबाजारात आज शनिवारी सोन्याच्या भावात तब्बल ८४० रुपयांची घसरण झाली आहे.. तर चांदीमध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. आज चांदी २१०० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्याआधी शुक्रवारी सोने २१० रुपयांनी तर चांदीमध्ये १००० रुपयांने महागली होती.
जळगावच्या सुवर्णबाजारात गेल्या दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमतीत चढउतार दिसून आले. आज तर दोन्ही धातूंमध्ये मोठी घट झाल्याचे पाहायला मिळालं आहे.
आजचा सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९०७ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,०७० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,६७३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४६,७३० रुपये मोजावे लागतील.
चांदीचा भाव
तर चांदीत गेल्या आठवड्यात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. आज चांदीच्या भावात २१०० रुपयाची घट झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा १ किलोचा भाव ७०,८०० रुपये आहे.