सोने-चांदी स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे जळगावातील नवीन दर

जून 2, 2021 9:10 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२१ । देशांतर्गत बाजारात सलग दुसर्‍या दिवशी सोनेच्या किमती वाढल्यात. जागतिक मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये वाढ झाल्यानंतर आज बुधवारी जळगावमधील सुवर्णबाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. तर काल मंगळवारी चांदीच्या भावात तब्बल ५ हजार २०० रुपयाची घट झाली होती. परंतु आज मंगळवारी चांदी देखील महागली आहे. आज सोने प्रति १० ग्रॅम २१० रुपयांची वाढ झाली.  तर चांदी ६०० रुपयाने वाढली आहे.

gold silver

जळगावच्या सुवर्णबाजारात गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत चढउतार दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमी असलेल्या निर्बंधादरम्यान सुवर्णपेढ्या बंद असल्या तरी मल्टी कमोडिटी मार्केटमध्ये सोने-चांदीत खरेदी विक्री सुरू आहे. यामध्ये निर्बंध लागू झाल्यापासूनच सोने-चांदीचे भाव वाढत आले. सोने एकदा पुन्हा ५० हजाराच्या उंबरठ्यावर आले आहे.

आजचा सोन्याचा भाव 

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९७० रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,७०० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,७३३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४७,३३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव 

तर आज चांदी महागली आहे. आज चांदीच्या प्रति १ किलोचा भाव ७२,६०० रुपये इतका आहे. मागील काही दिवसापासून चांदीच्या भावात पडझड दिसून येत आहे. कारण काल चांदीच्या भावात तब्बल ५ हजार २०० रुपयाची घट झाली होती. परंतु आज पुन्हा चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now