जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ । कोरोना काळात 58 हजार रुपयांच्या घरात गेलेले सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीय. जळगावमध्ये सोन्याचे दर तब्बल दीड हजार रुपयांपेक्षा अधिकने कमी झालेत. त्यामुळे सोने ४८ हजार रुपयांच्या घरात गेले आहे.
दरम्यान मागील गेल्या चार पाच दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरू असलेली घसरण सुरूच असून आज सोन्याचे दर प्रती १० ग्रॅम २६० रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोबतच चांदीच्या भावात देखील मोठी घट झाली आहे.
आजचा सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,७४९ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,४९० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५२३ रुपये असून १० ग्रॅम चा ४५,२३० रुपये आहे.
चांदीचा भाव
आज चांदीचा दर जैसे थे आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७४,००० रुपये इतका आहे.