---Advertisement---
जळगाव जिल्हा वाणिज्य

Gold Rate : जळगाव सुवर्णपेठेत सलग चौथ्या दिवशी सोने दरात वाढ ; आताचे लेटेस्ट भाव तपासून घ्या..

gold
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२५ । अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध चांगलेच भडकले असून याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर दिसून येत आहे. सोने दर दररोज नवनवीन विक्रमी पातळी गाठत असून जळगावच्या सुवर्ण नगरीत सोने दरात सलग चौथ्या दिवशी दरवाढ झाली.

gold

चालू आठवड्यातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी जळगाव सराफ बाजारात सोने पुन्हा ८०० रुपयांनी वाढले. यांनतर प्रती तोळ्याचा दर ९५८०० (जीएसटीसह ९८६४७) रुपयांवर पोहचला. हा सोने दराचा नवीन उच्चांक आहे. चालू आठवड्यात सोने दरात मंगळवारपासून तेजीची स्थिती आहे. मंगळवारी ९३३०० रुपयांवर असलेले सोने शेवटच्या दिवशी ९५८०० रुपयांवर पोहचले. चार दिवसात सोने प्रतितोळा २५०० रुपयांनी महागले आहे.

---Advertisement---

सोन्याच्या दरातील तेजी आगामी काळात कायम राहुन महिना अखेरपर्यंत ते १ लाख रुपये तोळ्यापर्यंत जाण्याचा अंदाज जाणकारांचा आहे. तर काहींनी याच महिन्यात सोने एक लाख 30 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमची झेप घेईल असा दावा करण्यात येत आहे

दरम्यान अक्षय तृतीय सण 30 एप्रिल 2025 रोजी आहे. अक्षय तृतीयेला सोने खरेदी शुभ मानण्यात येते. मात्र यंदा सोने दराने विक्रमी पातळी गाठलीय. आता खरेदीदारांचे अक्षय्य तृतियेपर्यंत सोने दर कोणता टप्पा गाठेल, त्याकडे लक्ष लागले आहे. मे महिन्यात लग्नकार्य असलेल्यांकडून किंमत आणखी वाढण्यापूर्वी सोने खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, उच्चांकी दरवाढीमुळे त्यांना आर्थिक ऐपतीनुसार सोने खरेदी करताना थोडा हात आखडताच घ्यावा लागत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment