हॉलमार्क सक्तीविरुद्ध जळगावचा सराफ बाजार बंद, उलाढाल ठप्प
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२१। आज सुवर्ण व्यवसायिकांतर्फे बंद पुकारण्यात आला आहे. सुवर्ण अलंकार यासाठी आता हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरची सक्ती विरोधात जळगाव शहरातील १५० तर जिल्हाभरातील २००० सराफा व्यवसायिका तर्फे आज बंद पुकारण्यात आला आहे. यामुळे जळगावातील सुवर्ण बाजारातील उलाढाल ठप्प झाली आहे.
जळगावात आज सुवर्ण व्यवसायिकांतर्फे बंद पुकारण्यात आला आहे. सुवर्ण अलंकार यासाठी आता हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरची सक्ती विरोधात देशभरात बंद पुकारला आहे. हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरची सक्ती ही करण्यात येऊ नये; अशी मागणी सराफ व्यवसायिकांची आहे. हूडनुसार सुवर्ण व्यावसायिकांकडे जितके अलंकार सोने– चांदी आहे. त्यांची नोंद ठेवावी लागणार आहे. त्यापेक्षा जास्त वस्तू सापडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाऊ शकते. याच पार्श्वभूमीवर सराफा असोसिएशनचे बंद पुकारला आहे.
सराफ व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंदमध्ये जळगाव शहरातील १५० तर जिल्हाभरातील २ हजार सराफा व्यवसायिकांतर्फे बंद ठेवण्यात आला आहे. यात अध्यक्ष गौतम लुनीया, उपाध्यक्ष अजय ललवाणी, सचिव स्वरुप लुंकड यांच्या माध्यमातून सराफा व्यावसायिकांनी बंद पुकारला आहे.
https://www.facebook.com/114263107373939/posts/228303519303230/