गोदावरी पायरेक्झीया २४ अंतर्गत फुटबॉल स्पर्धेला सुरूवात
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२४ । जळगाव येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या मैदानात पायरेक्झीया २४ अंतर्गत फुटबॉल स्पर्धेचा मोठ्या थाटात शुभारंभ झाला.
संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, सदस्य डॉ. अनिकेत पाटील, हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील आणि रजीस्ट्रार प्रमोद भिरूड इ मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ व फुटबॉल किक मारून शुभारंभ करण्यात आला. फुटबॉल खेळात संपुर्ण शारीरीक हालचाल होवून व्यायाम होतो आणि शरीर तंदुरूस्त राहते आपल्या देशात फुटबॉल लोकप्रिय होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. अनिकेत यांनी सांगितले. फुटबॉल आवडीचा विषय असून पहाटे उठून आवर्जुन सामने बघत असल्याच्या आठवणी त्यांनी यावेळी जागवल्यात.
या स्पर्धेत चार गु्रप पाडण्यात आले असून एकुण १६ संघानी सहभाग नोंदवला असून लिग पध्दतीने १७ मार्च ते अंतिम सामना २१ मार्च रोजी खेळवला जाणार आहे. संर्पुण स्पर्धेसाठी पंच म्हणून पंकज तिवारी काम बघणार आहे. स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेतील खेळाडू अमीत साखरे, पृथ्वीराज थोरात,चंदन मौर्य आणि शिवम पाटील देखिल सहभागी झाले आहे. विजेत्या संघास चषक,१११११ रोख,मेडल तसेच प्रमाणपत्र तर उपविजेता संघास संघास चषक,६६६६ रोख,मेडल तसेच प्रमाणपत्र तसेच प्रत्येक खेळाडूस प्रमाणपत्र दिले जाणार आहे. डॉ किसन दुधानी, अमीत साखरे, मोहम्मद नजीफ,डॉ संकेत गायकवाड हे परिश्रम घेत आहे.