जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशनतर्फे आयोजित गोदावरी क्रिकेट लीग २०२५ मध्ये गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपविजेतेपद पटकावले.

अंतिम सामन्यात डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या अगस्त्या बॅचला कडवी झुंज देत प्रेक्षकांची मने जिंकली.स्पर्धेत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या संघाने सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी करत सलग विजयांची मालिका कायम राखली. अंतिम सामन्यात डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या अगस्त्या बॅच कडव्या प्रतिस्पर्ध्यांसोबत जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. कठीण आव्हानाचा सामना करावा लागला असला तरी, जिद्द, चिकाटी आणि संघभावनेच्या जोरावर विद्यार्थिनींनी अप्रतिम खेळ साकारला.सौंदर्या पटेल हिने मालिकाविर पुरस्कार पटकावला
संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्राचार्य विशाखा गणवीर, उपप्राचार्य जसनीत दया, प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे, प्रा. पियुष वाघ, प्रा. प्रियंका गवई, प्रा. अभिजीत राठोड प्रशिक्षक आणि इतर प्राध्यापकांनी विजेत्या संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. खेळाडूंना गौरवित करण्यासाठी सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या यशामुळे महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात अशाच क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्याची प्रेरणा विद्यार्थिनींना मिळाली आहे.