⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | गोदावरी सीबीएसइ स्कुलमध्ये पालकांची भरली शाळा

गोदावरी सीबीएसइ स्कुलमध्ये पालकांची भरली शाळा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२३ । जळगाव येथील गोदावरी सीबीएसइ इंग्लिश मिडिअम स्कुलमध्ये इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांची प्रगती आणि अभ्यासक्रमाविषयी प्राचार्या निलीमा चौधरी यांनी पालकांना मार्गदर्शन केले. पालकांचीच शाळा भरल्याची अनुभुती यावेळी अनेकांना आली.

गोदावरी सीबीएसइ इंग्लिश मीडीअम स्कुल विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हाच केंद्रबिंदु मानुन शैक्षणिक कार्य करीत आहे. शाळेत शिकविला जाणारा अभ्यासक्रम, शाळेतील उपक्रम, आहार याविषयीची माहिती देण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी गुरुवारी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्या निलीमा चौधरी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल आणि इनक्वायरी बेस्ड शिक्षण आवश्यक असल्याचे मत प्राचार्या निलीमा चौधरी यांनी व्यक्त केले.

रायटींग लेस स्पीकिंग मोअर हे उद्दिष्ट शाळेचे आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांनी घरी शिक्षकाची भुमिका बजवावी. तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरीक विकासासाठी आहाराविषयी प्राचार्या निलीमा चौधरी यांनी पालकांना टिप्स दिल्या. स्लाइड शोच्या माध्यमातुन प्राचार्या चौधरी यांनी फिटनेस क्टिव्हिटी, स्पोर्ट्स क्टिव्हिटी, सांस्कृतिक कार्यक्रम यासह शाळेतील उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. मिनल पाटील, प्रा. चेतना महाजन ह्या उपस्थित होत्या.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.