जळगाव शहर
गो-सेवा एक अनुष्ठान अंतर्गत गो-सेवा
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । येथील पांजरपोळ संस्थेतर्फे अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा शाखेतर्फे गो-सेवा एक अनुष्ठान अंतर्गत नुकतीच गो-सेवा करण्यात आली.
गो सेवाव्रती अँड. विजय काबरा यांनी गोसेवा एक अनुष्ठान याबाबत मार्गदर्शन केले. तर सचिव अँड. सुभाष तायडे यांनी अखंडितपणे गोसेवा करावी असे आवाहन केले. गो-सेवेअंतर्गत गोमातेचे पूजन करून गोमातेला ग्रास, ढेप, गूळ अर्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष डॉ.अनिल देशमुख, संघटक जगन्नाथ तळेले, दिनेश तायडे, अँड. भारती अग्रवाल, कपिला मुठे, विजय मोहरीर, अँड. देवेंद्र जाधव, अँड. सीमा जाधव, शोभा तायडे, सविता नंदनवार, सविता माळी आदींची उपस्थिती होती.