---Advertisement---
विशेष अमळनेर जळगाव जिल्हा जळगाव शहर धरणगाव

जळगाव जिल्ह्यातील सुपूत्रांच्या ‘ग्लोबल आडगाव’ चित्रपटाची अमेरिकेत धूम

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | २ जानेवारी २०२३ | शेती मातीतल्या पिढ्यांची जीवघेणी घुसमट दाखविणार्‍या ग्लोबल आडगाव या मराठी चित्रपटाचा डंका केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही वाजत आहे. या चित्रपटाची निर्मिती खानदेशचे भूमिपुत्र उद्योजक अमृत मराठे यांनी केली आहे. या चित्रपटात शेती मातीत राबणार्‍या हातांचा समृद्ध संघर्ष चित्रीत करण्यात आला आहे. जळगाव जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब म्हणजे, ग्लोबल आडगाव या मराठी चित्रपटाची निवड अमेरिकेतील न्युजर्सी मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे. न्युजर्सी येथे होणार्‍या अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवीन वर्षात हा चित्रपट दाखविला जाणार आहे. या वेळी हॉलीवूड, बॉलीवूडमधील नामांकित दिग्दर्शक आपली हजेरी लावणार आहे.

ग्लोबल आडगाव jpg webp webp

सिल्वर ओक फिल्म्स अँड इंटरटेनमेंट प्रस्तुत, उद्योजक मनोज कदम निर्मित, उद्योजक अमृत मराठे सहनिर्मित आणि डॉ. अनिलकुमार साळवे लिखित व दिग्दर्शित ‘ग्लोबल आडगाव’ चित्रपट आहे. ग्लोबल आडगाव चित्रपटाचे सहनिर्मिता असलेले अमृत मराठे हे उद्योजक असून, त्यांचा रोटवद (ता.धरणगाव) या छोट्याशा खेड्यात प्रतिकूल परिस्थितीत शेतकर्‍याच्या घरी जन्म झाला. अमृत मराठे यांनी उदरनिर्वाहासाठी अनेक कंपन्या आणि मिळेल त्या ठिकाणी कामे केली. औरंगाबाद येथे हॉस्टेलवर राहून शिक्षण घेत कामे केली. अहोरात्र मेहनत घेतली आणि छोटासा उद्योग सुरू केला. अखंड मेहनत, प्रामाणिकता आणि सातत्य ठेवल्याने लघुउद्योगाचे मोठ्या उद्योगात रुपांतर झाले. आता उद्योगासोबतच चित्रपट क्षेत्रात उद्योजक मनोज कदम व अमृत मराठे यांनी मिळून ग्लोबल आडगाव चित्रपट निर्मित केला. सोबत जळगाव जिल्ह्यातील सोमनाथ मराठे, जानकिराम पाटील, चेतन महाजन, कैलास पाटील, त्र्यंबक पाटील, नीलेश पाटील यांनी चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

---Advertisement---

कोलकाता अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ३००० चित्रपटातून १४ भारतीय चित्रपट निवडले गेले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातून केवळ ग्लोबल आडगाव या मराठी चित्रपटाची निवड झाली होती. दिग्दर्शक अनुराग बसू, कांतारा चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक निरीक्षित देव तर परीक्षक साजीयन कडोनी यांनी चित्रपटाची बांधणी, कलाकारांचा नैसर्गिक अभिनय तंत्रशुद्ध बांधणी आणि दिग्दर्शनाचे प्रचंड कौतुक केले आहे.

हे आहेत कलाकार

या चित्रपटात अभिनेता सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, अनिल नगरकर, उपेन्द्र लिमये, रोनक लांडगे, अशोक कालगुडे, सिद्धी काळे, महेंद्र खिल्लारे, अनिल राठोड, संजीवनी दिपके, साहेबराव पाटील, शिवकांता सुतार, विष्णू भारती, ऋषिकेश आव्हाड, परमेश्वर कोकाटे, अभिजीत मोरे, विष्णू चौधरी, रामनाथ कातोरे, विक्रम त्रिभुवन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---