---Advertisement---
जळगाव जिल्हा जामनेर राजकारण

गिरीश महाजनांचा एकनाथराव खडसेंना ‘दे धक्का’ : शेकडो कार्यकर्ते भाजपात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२२ । जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी राज्याचे ग्रामविकास पंचायती राज व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना धक्का समाजाला जात आहे.

eknath khadse girish mahajan jpg webp

केंद्र सरकारने मोदीजींच्या सक्षम नेतृत्वातही देशातील सर्वात शेवटच्या माणसापर्यंत विविध प्रकारच्या योजना पोहचविल्या आहेत. त्यामुळेच जनतेचा भारतीय जनता पार्टीवर विश्वास असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास तथा क्रिडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी केले. शहरातील श्रीमंत बाबाजी राघोबा पाटील मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह विविध पक्षांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेश सोहळ्या प्रसंगी मंत्री गिरीश महाजन बोलत होते.

---Advertisement---

व्यासपीठावर भाजपात प्रवेश घेतलेले माजी पंचायत समिती सदस्य व बंजारा समाजाचे नेते रामलाल बल्लु नाईक (मालखेडा), तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जितु पाटील, जे. के. चव्हाण, उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, रमेश नाईक यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

तालुक्यातील मालखेडा, मोराड तांडा, फत्तेपुर येथील राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमधे प्रवेश केला. त्यांचा सत्कार यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केला. काँग्रेस देशातील फक्त दोनच राज्यात सत्तेवर असुन शेवटची घटका मोजत आहे, तर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचेही लवकरच पतनाकडे वाटचाल होऊन त्यांच्याकडे बोटावर मोजण्या इतकेच लोक आगामी काळात उरणार नसल्याचेही भाकीतही मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---