⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

गद्दारांच्या सरकारचा धिक्कार असो; विरोधकांच्या घोषणाबाजीवर गिरीश महाजन म्हणतात, हे सगळे…

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Sessions) आजपासून सुरुवात झाली आहे. येत्या 25 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहेत. दरम्यान, अधिवेशनाच्या सुरुवातीला महाविकास आघाडीतर्फे (MVA) विधानभवनाच्या पायऱ्यांवर आक्रमक आंदोलन करण्यात आलं. त्यांच्या या आंदोलनावरून भाजपचे (BJP) मंत्री ना. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाविकास आघाडीतर्फे (MVA) विधानभवनाच्या पायऱ्यांवर आक्रमक आंदोलन करत घोषणाबाजी केली. 50 खोके, एकदम ओक्के सरकारचा धिक्कार असो. गद्दारांच्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. त्यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. आंदोलन आणि घोषणाबाजी करणारे सगळे सध्या चौकशीच्या फेऱ्यांमध्ये अडकले आहेत. त्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे. जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी ते अशा प्रकारे घोषणाबाजी करत असल्याचं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय

मला वाटतं त्यांची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. सरकार स्थिरसावर आहे.. हे सगळे चौकशीच्या फेऱ्यात आहे. यांना लोकांचं लक्ष विचलित करायचं आहे. आपल्यावर जे दररोज आरोप होत आहेत. ज्यांच्यावर आरोप झालेत ते सगळे जेलमध्ये आहेत. कोर्टही त्यांना बेल देत नाहीये. ईडीने अटक केली असेल पण पुरावे बघितल्यावर कोर्टानेही त्यांना जामीन दिलेली नाही. असे महाजन म्हणाले.