⁠ 
सोमवार, एप्रिल 22, 2024

Jalgaon : इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतदेहांच्या आकड्याबाबतीत गिरीश महाजन म्हणाले…..

जळगाव लाईव्ह न्यूज। २२ जुलै २०२३। रायगडमधील इर्शाळवाडी इथं घडलेल्या भीषण दरड दुर्घटनेची बचाव मोहीम सुरु आहे. या बचाव मोहिमेत आत्तापर्यंत २६ जणांचे मृतदेह सरकारच्या हाती आले आहेत. पण ही संख्या तीन आकडी असू शकते, अशी भीती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनं यांनी व्यक्त केली आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेची बद्दल समजताच सुरुवातीपासून गिरीश महाजन हे घटनास्थळी हजर होते. सरकारच्यावतीनं बचाव मोहिमेचं नेतृत्व करत होते.

जळगावच्या बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एका कार्यक्रमात ते बोलत होते.त्यावेळी, या दुर्घटनेची माहिती कळताच पहाटे ३ वाजता आम्ही घटनास्थळी होतो. यावेळी वादळी पाऊस बरसत होता. या हवामानाच्या स्थितीमुळं बचावकार्यात बरेच अडथळे येत होते. पण इथली परिस्थीती भीषण होती, असे ते म्हणाले.

सुरुवातीला आम्ही काही जणांना वाचवलं. आत्तापर्यंत या दुर्घटनेत २२ ते २४ मृतदेह हाती आले आहेत. पण हा संख्या तीन आकडी असू शकते. इर्शाळवाडीत अडीचशे कुटुंब राहत असल्याची माहिती मिळतेय. पण यांपैकी सुमारे सव्वाशे लोकांना आत्तापर्यंत बाहेर काढण्यात यश आलं आहे, असंही महाजन यावेळी म्हणाले.

समोर येणाऱ्या माहितीनुसार, इर्शाळवाडीत सध्या २६ मृतदेह हाती आले आहेत. तर अजूनही सुमारे ६० लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच आत्तापर्यंत दीडशेहून अधिक लोकांना वाचवण्यात यश आलं आहे.