मग् रोजरोज लक्षवेधी कशा येतात? विधानपरिषदेत मंत्री महाजनांनी एकनाथ खडसेंची खरडपट्टी काढली

मार्च 24, 2026 5:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । विधान परिषदेत आज एकनाथ खडसे यांच्या गैरहजेरीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले. खडसे यांच्या नावाने वारंवार प्रश्न येत असतानाही ते सभागृहात उपस्थित नसल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र यावर उत्तर देताना शशिकांत शिंदे यांनी ‘जादूटोणा’चा उल्लेख करताच सभागृहात एकच हशा पिकला.

girish mahajan khadse

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून एकनाथ खडसे यांच्या नावाने अनेक लक्षवेधी आणि प्रश्न मांडले जात आहेत. परंतु तब्येत बिघडल्यामुळे ते सभागृहात उपस्थित राहत नसल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी गिरीश महाजन यांनी आक्षेप घेत, “सभागृहात येत नसतील तर रोज प्रश्न का टाकले जात आहेत?” असा सवाल उपस्थित केला.

यावर शशिकांत शिंदे यांनी खडसे आजारी असल्याचे स्पष्ट करत, काही लोकांनी त्यांच्यावर जादूटोणा केला का, याचाही शोध घेत असल्याचे विनोदी स्वरात म्हटले. त्यांनी ‘नाशिकच्या बाबांकडे जाऊन जादूटोणा झाला का?’ अशी शक्यता व्यक्त केल्याने सभागृहात उपस्थित सदस्यांमध्ये हशा पसरला.

दरम्यान, गिरीश महाजन यांनी पुन्हा संताप व्यक्त करत, अधिकारी काम सोडून माहिती देण्यासाठी येतात, पण संबंधित सदस्य उपस्थित राहत नाहीत, हे योग्य नसल्याचे नमूद केले. परिस्थिती चिघळू नये म्हणून सभापतींनी हस्तक्षेप करत विषयावर जास्त वादविवाद टाळण्याचे निर्देश दिले.

या घटनेमुळे विधान परिषदेत आज राजकीय टोलेबाजी आणि विनोद यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now