जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । जळगाव महापालिकेतील एकहाती सत्ता हातातून निघत असतानाच जळगाव भाजपसमोर अजून एक नवीन संकट उभे राहिले आहे. भाजपचे संकटमोचक माजी मंत्री. आ. गिरीश महाजन कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी गुरुवारी दिनांक १८ मार्च रोजी निवडणूक होत आहे. भाजपचे काही बंडखोर शिवसेनेला मिळाले आहेत. त्यामुळे भाजप नेते व संकटमोचक गिरीश महाजन महापालिका राजकारणातले डॅमेज कंट्रोल करण्यात व्यस्त असतानाच त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भाजप समोरील अडचणी अजून वाढल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून गिरीश महाजन यांना ताप होता. सोमवारी ते मुंबईला रवाना झाले होते. तर मंगळवारी तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.