भाजपा आता काँग्रेसला खिंडार पाडणार? संकटमोचक महाजनांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चेला उधाण..
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२२ । राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी नवीन सरकार स्थापन केलं आहे. या सरकारला स्थापन होऊन आता जवळपास चार महिने झाले. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार पडण्याच्या चर्चांना राज्यात उधाण आलंय. यातच राष्ट्रवादी (NCP), शिवसेना (Shiv Sena) नेत्यांनी सरकारला धोका असल्याचं भाकित केलंय. आता अशातच भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
काय म्हणाले नेमकं?
ते म्हणाले, ‘ राज्यभरातले अनेक नेते भाजपात येण्याच्या मार्गावर आहेत. संपर्कातही आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, आता मी नावं कोट करणार नाही. फक्त या जिल्ह्यातलेच नाहीत. तर महाराष्ट्रातून अनेक लोकं, बडे मंडळी… आपल्या पक्षाचं भवितव्यं काय हे, ज्यांना कळतंय. त्यांना बऱ्याच जणांना भाजपात येण्याची इच्छा आहे, असे ते म्हणाले.
विशेष म्हणजे काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याच नांदेड जिल्ह्यात गिरीश महाजन यांनी वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. फक्त याच जिल्ह्यातून नव्हे तर राज्यभरातून नेते संपर्कात आहेत, असे म्हटल्याने भाजपा आता काँग्रेसला खिंडार पाडणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.