⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

10th Result On SMS : दहावीचा निकाल तुमच्या फोनवर मिळवणे आता अगदी सोप्पे

जळगाव लाईव्ह न्यूज । 10th Result On SMS बाराविचा निकाल लागल्यानंतर आता ओढ लागली आहे ती १०विच्या निकालालची येत्या काही दिवसात दहावीचा निकाल लागणार हे निश्चित आहे. हा निकाल ऑनलाईन लागणार आहे हे जरी खरे असले तरी तुम्ही हा निकाल आपल्या फोनवर देखील मिळवू शकता त्यासाठी तुम्हाला SMS च्या मदतीनेही हा निकाल पाहता येणार आहे.

दहावीचा निकाल पाहण्यासाठी mahresult nic in आणि mahahsscboard in या दोन वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. तिथे दिलेली माहिती अपलोड केल्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येईल. दहावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये पार पडली होती. बारावीचा निकाल लागला आहे. आता प्रतीक्षा दहावीच्या निकालाची आहे.

बऱ्याचदा साईट स्लो झाल्याने किंवा नेट उपलब्ध नसल्याने ऑनलाइन निकाल पाहाणं शक्य होत नाही. तर अशावेळी तुम्ही SMS द्वारे निकाल पाहू शकता. तुम्हाला एक SMS करायचा आहे. त्यावर तुमचा सीट नंबर आणि नाव द्यायचं आहे. तुम्ही तो SMS पाठवला की तुम्हाला तुमचा निकाल SMS द्वारेच पाहता येईल.

तुमच्या फोनमध्ये तुम्हाला SMS अॅप सुरू करायचं आहे. तिथे क्रिएट न्यू मेसेजवर क्लीक करा. तिथे MHHSC (स्पेस) SEAT NO. (उदा. 123654) हे डिटेल्स भरून 57766 नंबरवर SMS करायचा आहे. काही मिनिटांत तुम्हाला तुमच्या फोनवर SMS द्वारे किती मार्क मिळाले हे समजणार आहे.