नागरिकांनो लक्ष द्या! 30 सप्टेंबरपर्यंत ‘ही’ कामे मार्गी लावा, अन्यथा…
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२३ । सप्टेंबर महिना अर्ध्याहून संपला असून त्यांनतर काही दिवसानंतर ऑक्टोबर महिना सुरू होणार आहे. यासोबतच लोकांनी काही कामे वेळेवर करावीत. अशीही काही कामे आहेत ज्यांची मुदत सप्टेंबरमध्ये असून ही कामे सप्टेंबर महिन्यात पूर्ण न झाल्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल…
2000 रुपयांची नोट- RBI ने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बँक खात्यात जमा करण्यासाठी किंवा बँकेतून बदलून घेण्यासाठी वेळ दिला होता. अशा परिस्थितीत, सप्टेंबर अखेरपर्यंत लोकांनी त्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांची नोट जमा करावी किंवा बँकेतून बदलून घ्यावी.
एसबीआय स्पेशल एफडी- ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआयच्या विशेष एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे. एसबीआय वेकेअर स्पेशल एफडी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. यामध्ये ७.५ टक्के व्याज मिळते.
IDBI अमृत महोत्सव FD- IDBI ने विशेष FD योजना सुरू केली आहे. आयडीबीआयच्या या एफडीचे नाव अमृत महोत्सव एफडी योजना आहे. 375 दिवसांच्या या FD योजनेत सर्वसामान्य नागरिकांना 7.10 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज मिळते. 444 दिवसांच्या FD अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना 7.15 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.65 टक्के दराने व्याज मिळत आहे. त्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.
डिमॅट आणि म्युच्युअल फंड नामांकन- डिमॅट आणि म्युच्युअल फंडातील नामनिर्देशित व्यक्तीचे तपशील देणे खूप महत्वाचे आहे. SEBI ने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ट्रेडिंग, डिमॅट खातेधारक आणि म्युच्युअल फंडांना नामनिर्देशित करण्यासाठी किंवा नामनिर्देशित व्यक्तीची निवड रद्द करण्यासाठी वेळ दिला आहे.