⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 25, 2024
Home | बातम्या | 150 रुपयांच्या बचतीवर मिळतील 19 लाख रुपये!

150 रुपयांच्या बचतीवर मिळतील 19 लाख रुपये!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । आपल्या मुलांसाठी LIC ची ‘ही’ आहे खास योजना, 150 रुपयांच्या बचतीवर मिळतील 19 लाख रुपये! भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) लोकांसाठी अनेक योजना आणते. ज्यामध्ये गुंतवणूक करून चांगला लाभ मिळू शकतो. तसेच विम्यासह चांगला फंडही मिळतो.

तुम्हाला तुमच्या मुलांसाठी एलआयसीमध्ये गुंतवणूक करायची असेल, ज्यामुळे त्याचे भवितव्य सुरक्षित होईल तर एलआयसीमध्ये न्यू चिल्ड्रेन मनी बॅक प्लॅन आहे.

यामध्ये दररोज 150 रुपयांची बचत केल्यास तुमच्या मुलांना फायदा होईल. त्यामुळे या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेवूयात…!

काय आहे न्यू चिल्ड्रेन मनी बॅक प्लॅन?

तुम्हाला योजनेअंतर्गत गुंतवणूक करायची असेल तर उशीर करू नका. आयुर्विमा महामंडळाची न्यू चिल्ड्रेन मनी बॅक पॉलिसी 25 वर्षांसाठी घेतली जाते. यामध्ये, मॅच्युरिटी रक्कम हप्त्यात दिली जाते. तुमचे पहिल्यांदा मूल 18 वर्षांचे असताना, दुसर्‍यांदा 20 वर्षांचे झाल्यावर आणि तिसर्‍यांदा 22 वर्षांचे झाल्यावर रक्कम दिली जाते.

बोनसचा लाभ मिळतो का?

या योजनेअंतर्गत, आयुर्विमाधारकाला विम्याच्या रकमेच्या 20-20 टक्के रक्कम मनी बँक टॅक्स म्हणून मिळते. यासोबतच मूल 25 वर्षांचे झाल्यावर त्याला संपूर्ण रक्कम दिली जाते. उर्वरित 40 टक्के रकमेसोबत बोनसही दिला जातो. म्हणजेच, जर एखाद्याने या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली तर जास्तीत जास्त रक्कम मिळू शकते.

यासाठी पात्रता काय असावी?

पॉलिसी घेण्याची वयोमर्यादा शून्य ते 12 वर्षे आहे.
60 टक्के रक्कम हप्त्यांमध्ये आणि 40 टक्के रक्कम मुदतपूर्तीच्या वेळी बोनससह दिली जाते.
या अंतर्गत 1,00,000 रुपयांचा किमान विमा घेता येतो आणि कमाल मर्यादा नाही.
जर हप्ते भरले नाहीत तर व्याजासह एकरकमी रक्कम दिली जाते.

किती रक्कम जमा करावी लागते?

या पॉलिसी अंतर्गत, जर कोणी दररोज 150 रुपयाची बचत करत असेल , तर विम्याच्या प्रीमियम वार्षिक 55,000 दिला जातो.
म्हणजे 365 दिवसानुसार 25 एकूण 14 लाख रुपये जमा करावे लागतील.
तुम्ही 14 लाख रुपये जमा केल्यावर, मॅच्युरिटीव्हीवर तुम्हाला 19 लाख रुपये मिळतील .
जर तुम्हाला मधेच पैसे घ्याचे नसतील, तर तुम्हाला मॅच्युरिटीव्हीवर बोनससह एकरकमी रक्कम दिली जाते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह