⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

भविष्यातील आजार टाळण्यासाठी नियमित कान तपासणी करा : डॉ. जयप्रकाश रामानंद

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । मनुष्याच्या पंचज्ञानेंद्रियपैकी कान हा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक नागरिकाने कानाची नियमित तपासणी करून घेतली पाहिजे. जेणेकरून भविष्यातील कानाचे आजार उद्भवणार नाहीत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नियमित तपासणीसाठी यावे असे आवाहनवजा प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.

जागतिक श्रवणदोष दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये गुरुवार दि. ३ मार्च रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरोदे यावेळी उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रस्तावनामधून जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. स्वप्नजा तायडे यांनी कार्यक्रमामागील उद्देश सांगितला.

डॉ. अक्षय सरोदे यांनी कानाच्या आरोग्यविषयी माहिती सांगितली. कान साफ करण्यासाठी कधीही कोणत्याही वस्तूचा वापर करू नका. सार्वजनिक क्षेत्रात वावरत असताना आवाजाच्या गोंगाटामुळे श्रवणशक्ती कमी होण्याची शक्यता असते. दीर्घकालीन कानातले संक्रमण श्रवणशक्ती कमी होण्यास कारणीभूत ठरते असेही त्यांनी सांगितले. यावेळी कॉकलीअर इमप्लान्ट शस्त्रक्रिया झालेल्या मुलांना वाचा उपचाराच्या नियमीत कोर्समुळे झालेल्या फायदा विषयी माहिती वाचा तज्ज्ञ डॉ. राजश्री वाघ यांनी सांगितले.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कान-नाक-घसा विभाग हा अद्ययावत झाला असल्याचे सांगत याठिकाणी कर्णबधिर नागरिकांसाठी ऑडिओलॉजी विभागाची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सूत्रसंचालन व आभार चंद्रकांत ठाकूर यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. विनोद पवार, डॉ. प्रसेनजित बोराडे, डॉ. देवयानी महाजन, रुचिका साळुंखे, ऑडिओलॉजिस्ट मुनज्जा शेख, इंटर्न समृद्धी कदम, जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । मनुष्याच्या पंचज्ञानेंद्रियपैकी कान हा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक नागरिकाने कानाची नियमित तपासणी करून घेतली पाहिजे. जेणेकरून भविष्यातील कानाचे आजार उद्भवणार नाहीत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नियमित तपासणीसाठी यावे, असे आवाहनक प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.

जागतिक श्रवणदोष दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये गुरुवार रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरोदे यावेळी उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रस्तावनामधून जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. स्वप्नजा तायडे यांनी कार्यक्रमामागील उद्देश सांगितला.