जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । दरवर्षी दसऱ्यानिमित्त शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर म्हणजेच शिवतीर्थावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा हाच शिवसेनेचा दसरा मेळावा घेणार कोण? यावरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद पाहिला मिळत आहे. दोघांमध्येही या विषयावर चढाओढ सुरू झाली आहे. यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने जमा व्हा, असे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत विभाग प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी आगामी दसरा मेळाव्याची चर्चा करण्यात आली. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण जे काम यापूर्वी करत आलो आहोत, तेच काम आपल्याला पुढे न्यायचे आहे. यामुळे सज्ज व्हा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करा, असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
तसेच, २१ तारखेला होणाऱ्या गटप्रमुख आणि उपशाखाप्रमुख यांचा मेळाव्या बाबत चर्चा करण्यात आली. शिवाजी पार्कवर दरवर्षी होणारा दसरा मेळावा बाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. दोन्ही मेळाव्यात चांगले व्हावे त्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहिजे. या अनुषंगाने कामाला सुरुवात करा. असे आदेश यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.