सर्वसामान्यांना वर्षभर तरी पॅसेंजरने प्रवास करणे दूरच
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२१ । रेल्वे प्रशासनाकडून अनेक विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यामुळे अजून वर्षभर तरी सर्वसामन्यांपासून पॅसेंजरने प्रवास करणे दूरच आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आरक्षित गाड्यांतून जादा तिकीट दर देऊन वा एसटीने अधिक पैसे मोजावे लागत आहेत. तसेच या विशेष गाड्या सर्वच स्थानकांत थांबत नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसून वेळही अधिक खर्ची करावा लागत आहे. त्यामुळे पॅसेंजर गाड्या लवकर सुरू करावी, अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
कोरोनाकाळात सर्वच पॅसेंजर रेल्वे रद्द करून विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांतून प्रवास करण्यासाठी तिकीट आरक्षित करावे लागते. मात्र, सर्वसामन्यांना विशेष गाड्यांचे दर परवडत नाहीत. तसेच या विशेष गाड्यांना लहान स्थानकांत थांबाही नसल्याने सर्वसामन्यांना एसटीने जादा पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या पॅसेंजर काड्या सुरू करावेत. तसेच विशेष गाड्यांनाही सर्वच स्थानकांत थांबा द्यावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
या स्थानकांत विशेष गाड्यांना थांबा नाही
भादली, शिरसोली, म्हसावद, माहेजी, गाळण, नगरदेवळा, कजगाव, वाघळी, दुसखेडा, सावदा, निभोंरा, वाघोडा, असिरगड, चांदणी, मांडवा, सागफाटा, डोंगरगाव, बगमार, वरणगाव, आचेगाव, खामखेड, वडोदा, बिस्वाब्रिज, खुमगाव, बुरटी, जलंब, नागझेरी, पारस, गायगाव या स्थानकांत गाड्या थांबत नाही.
या पॅसेंजर जळगावातून
भुसावळ-देवळाली शटल, भुसावळ-वर्धा पॅसेंजर, भुसावळ-अमरावती पॅसेंजर, भुसावळ-कटनी पॅसेंजर, भुसावळ-इटारसी पॅसेंजर या पॅसेंजर जळगाव स्थानकातून धावतात. मात्र, कोरोना काळापासून पॅसेंजर बंदच आहेत.